लगावली - गालगाल गालगाल गालगाल गालगा
आरसा नको बघूस तू , मला बघून घे
रूप आज डोळीयांत कैद , न्याहळून घे
गुंतलो सखी तुझ्या अ दं!मधी अता पुरा
तोल आज जाऊ पाहि , आज सावरून घे
तीर मारती मला , नयन तुझे इथे तिथे
जीव घेऊनी बळेच हासती , मिटून घे
लाजणे असे जणू , वसंत बहरला जसा
धुंद या क्षणांमधी , प्रिये तु मोहरून घे
ठोकरून मी दिले , हरेक बोल प्रीतिचे
भेट फक्त आसवांचि , ओंजळी भरून घे
....... वैभव आलीम (३०/०३/१२)